महाराष्ट्र विधान परिषद

महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह

Consell Legislatiu de Maharashtra (ca); महाराष्ट्र विधान परिषद (hi); মহারাষ্ট্র বিধান পরিষদ (bn); Maharashtra Legislative Council (en); マハーラーシュトラ州議会上院 (ja); המועצה המחוקקת של מהאראשטרה (he); महाराष्ट्र विधान परिषद (mr) upper house legislature of Indian state of Maharashtra (en); महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह (mr); בית עליון בבית מחוקקים מדינתי (he) マハーラーシュトラ州上院 (ja)

महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.[१] राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).[२]

महाराष्ट्र विधान परिषद 
महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधान परिषद
ह्याचा भागमहाराष्ट्र विधानमंडळ
स्थान महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र भागमहाराष्ट्र
भाग
  • Member of Maharashtra Legislative Council
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विधानपरिषदेबद्दल माहितीसंपादन

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचनासंपादन

१९५६ च्या ७ व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे.[३] घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणीसंपादन

रचना :
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.[४]
१/६ राज्यपालाकडून सदस्य नामनिदेशित केले जातात, यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रतासंपादन

  1. तो भारताचा नागरिक असावा.
  2. त्याच्या वयाची ३० वर्ष पूर्ण झालेली असावी.[५]
  3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकालसंपादन

सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकालसंपादन

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.[६]

गणसंख्यासंपादन

१/१० इतकी गणसंख्या असतो.

अधिवेशनसंपादन

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापतीसंपादन

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.[७]

मतदारसंघ आणि सदस्य (७८)संपादन

महाराष्ट्र विधान परिषदेचे अलीकडील सदस्य खालीलप्रमाणे आहेत[८]

विधानसभेच्या सदस्यांनी निवडलेले (३०)संपादन

      भाजप (१३)      शिवसेना (६)      राष्ट्रवादी (५)      काँग्रेस (४)      शेकाप (१)      रासप (१)

#सदस्यपक्षकार्यकाळ
प्रवीण दरेकरभाजप८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
राम शिंदेभाजप८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
उमा खापरेभाजप८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
श्रीकांत भारतीयभाजप८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
प्रसाद लाडभाजप८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
रणजितसिंह मोहिते-पाटीलभाजप१४-मे-२०२०१३-मे-२०२६
प्रवीण दटकेभाजप१४-मे-२०२०१३-मे-२०२६
गोपीचंद पडळकरभाजप१४-मे-२०२०१३-मे-२०२६
रमेश कराडभाजप१४-मे-२०२०१३-मे-२०२६
१०निलय नाईकभाजप२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
११राम पाटील रातोळीकरभाजप२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
१२रमेश पाटीलभाजप२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
१३विजय गिरकरभाजप२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
१४सचिन अहिरशिवसेना८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
१५आमश्या पाडवीशिवसेना८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
१६उद्धव ठाकरेशिवसेना१४-मे-२०२०१३-मे-२०२६
१७नीलम गोऱ्हेशिवसेना१४-मे-२०२०१३-मे-२०२६
१८अनिल परबशिवसेना२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
१९मनिषा कायंदेशिवसेना२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
२०रामराजे नाईक निंबाळकरराष्ट्रवादी८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
२१एकनाथ खडसेराष्ट्रवादी८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
२२शशिकांत शिंदेराष्ट्रवादी१४-मे-२०२०१३-मे-२०२६
२३अमोल मिटकरीराष्ट्रवादी१४-मे-२०२०१३-मे-२०२६
२४बाबाजानी दुराणीराष्ट्रवादी२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
२५भाई जगतापकाँग्रेस८-जुलै-२०२२७-जुलै-२०२८
२६राजेश राठोडकाँग्रेस१४-मे-२०२०१३-मे-२०२६
२७वजाहत अथर मिर्झाकाँग्रेस२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
२८प्रज्ञा राजीव सातवकाँग्रेस२३-नोव्हेंबर-२०२१२७-जुलै-२०२४
२९जयंत पाटीलशेकाप२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४
३०महादेव जानकररासप२८-जुलै-२०१८२७-जुलै-२०२४

स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातून निवडून आलेले (२२)संपादन

कळा:      भाजप (9)      शिवसेना (5)      काँग्रेस (3)      राष्ट्रवादी (2)      रिक्त (११)

#मतदारसंघसदस्यपार्टीकार्यकाळ
मुंबईसुनील शिंदेशिवसेना२-जानेवारी-२०२२१-जानेवारी-२०२८
मुंबईराज हंस सिंगभाजप२-जानेवारी-२०२२१-जानेवारी-२०२८
धुळे-नंदुरबारअमरीश पटेलभाजप२-जानेवारी-२०२२१-जानेवारी-२०२८
नागपूरचंद्रशेखर बावनकुळेभाजप२-जानेवारी-२०२२१-जानेवारी-२०२८
अकोला-वाशिम-बुलढाणावसंत खंडेलवालभाजप२-जानेवारी-२०२२१-जानेवारी-२०२८
कोल्हापूरसतेज पाटीलकाँग्रेस२-जानेवारी-२०२२१-जानेवारी-२०२८
औरंगाबाद-जालनाअंबादास दानवेशिवसेना३०-ऑगस्ट-२०१९२९-ऑगस्ट-२०२५
उस्मानाबाद-लातूर-बीडसुरेश धसभाजप२२-जून-२०१८२१-जून-२०२४
अमरावतीप्रवीण पोटेभाजप२२-जून-२०१८२१-जून-२०२४
१०वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीरामदास आंबटकरभाजप२२-जून-२०१८२१-जून-२०२४
११नाशिकनरेंद्र दराडेशिवसेना२२-जून-२०१८२१-जून-२०२४
१२परभणी-हिंगोलीरिक्त[[ ]]
१३रायगड-रत्‍नागिरी-सिंधुदुर्गरिक्त[[ ]]
१४जळगाव[[ ]]
१५भंडारा-गोंदियारिक्त
१६पुणेरिक्त
१७सांगली-सातारारिक्त
१८नांदेडरिक्त १९यवतमाळ[[रिक्त
२०ठाणे-पालघररिक्त
२१अहमदनगररिक्त
२२सोलापूररिक्त

शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले (७)संपादन

      राष्ट्रवादी (१)      काँग्रेस (१)      अपक्ष (५)

#मतदारसंघसदस्यपार्टीकार्यकाळ
पुणेजयंत आसगावकरकाँग्रेस७-डिसेंबर-२०२०६-डिसेंबर-२०२६
अमरावतीकिरण सरनाईकअपक्ष७-डिसेंबर-२०२०६-डिसेंबर-२०२६
मुंबईकपिल वामन पाटीलअपक्ष८-जुलै-२०१८७-जुलै-२०२४
नाशिककिशोर दराडेअपक्ष८-जुलै-२०१८७-जुलै-२०२४
औरंगाबादसतिश चव्हाणराष्ट्रवादी८-डिसेंबर २०२०७-डिसेंबर २०२६
कोकणज्ञानेश्वर म्हात्रेभाजप८-फेब्रुवारी-२०२३७-फेब्रुवारी-२०२९
नागपूरसुघाकर आडबालेकॉग्रेस ८-फेब्रुवारी-२०२३७-फेब्रुवारी-२०२९

पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले (७)संपादन

      राष्ट्रवादी (२)      काँग्रेस (२)      भाजप (१)      शिवसेना अपक्ष(१) (१)

#मतदारसंघसदस्यपार्टीकार्यकाळ
नागपूरअभिजित वंजारीकाँग्रेस७-डिसेंबर-२०२०६-डिसेंबर-२०२६
औरंगाबादविक्रम काळे राष्ट्रवादी८- फेब्रुवारी - २०२३०७ - फेब्रुवारी - २०२९

-

पुणेअरुण लाडराष्ट्रवादी७-डिसेंबर-२०२०६-डिसेंबर-२०२६
मुंबईविलास पोतनीसशिवसेना८-जुलै-२०१८७-जुलै-२०२४
कोकणनिरंजन डावखरेभाजप८-जुलै-२०१८७-जुलै-२०२४
अमरावतीघनंजय लिंगाडेकाँग्रेस८-फेब्रुवारी-२०२३७-फेब्रुवारी-२०२९
नाशिकसत्यजित तांबेअपक्ष८-फेब्रुवारी-२०२३७-फेब्रुवारी-२०२९

राज्यपाल नामनिर्देशित (१२)संपादन

      रिक्त (१२)

#सदस्यपार्टीकार्यकाळ
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
रिक्त
१०रिक्त
११रिक्त
१२रिक्त

बाह्य दुवेसंपादन

  1. http://103.23.150.139/Home/Index
  2. https://www.mpscworld.com/bharatiy-nyayvyavashtebaddal-sampurn-mahiti/
  3. https://www.mpscworld.com/vidhanparishadebaddal-sampurn-mahiti/
  4. http://mls.org.in/pdf/Margdarshika.pdf

संदर्भ आणि नोंदीसंपादन

  1. ^ विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  2. ^ विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  4. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  5. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  7. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  8. ^ http://mls.org.in/pdf2021/winter/list-of-council-member.pdf साचा:Bare URL PDF
🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन