वसईचा तह

वसईचा तह हा ३१ डिसेंबर, इ.स. १८०२ रोजी मराठा साम्राज्यातील दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात वसई येथे झालेला एक तह होता.

पार्श्वभूमीसंपादन

८ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी नाना पुरंदरेच्या नेतृत्वाखालील पेशव्याच्या एका तुकडीचा बारामतीजवळ होळकरच्या फौजेने पराभव केला. दुसऱ्या बाजीरावाची पुरेशी सुसज्ज नसलेली सेना एक तासाच्या आतच यद्धभूमीवरून सैरावरा पळत सुटली. या स्थितितही ब्रिटिशांची मदत घेऊ नये असा सल्ला दुसऱ्या बाजीरावाला त्याच्या समर्थकांनी दिला. पण तरिही १४ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी पेशव्याने आपला एक प्रतिनिधी पुणे येथील तत्कालिन रेसिडेंट कर्नल बॅरी क्लोज याच्या घरी पाठविला व ब्रिटिशांशी करार करण्याची इच्छा व्यक्त केली. ही बोलणी पढे सुरू होण्यापूर्वीच होळकर आणि पेशवे यांच्या फौजेत पुण्याजवळ हडपसर येथे २५ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी युद्ध झाले. युद्धाच्या दिवशी सकाळी दुसरा बाजीराव पेशवा याने आपला प्रतिनिधी रघुनाथरावाला (याचा रघुनाथराव उर्फ राघोबादादा याच्याशी काही संबंध नाही) तहाचा प्रस्ताव घेऊन पाठविले. पण वेळेअभावी तहाच्या अटींना अंतिम रूप देणे त्यादिवशी शक्य झाले नाही. हडपसरच्या युद्धाला सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाली व ते दुपारपर्यंत चालले. या युद्धात पेशवा आणि शिंदे यांच्या संयुक्त फौजेला होळकराने पराभूत केले. हडपसरचे युद्ध सुरू असताना पेशवा स्वतः त्याच्या अंगरक्षकांसह पुण्याबाहेर येऊन युद्धाचे निरीक्षण करीत होता. त्याच्या सैन्याचा त्याला पराभव दिसू लागताच त्याने पुण्याहून पलायन केले. २५ ऑक्टोबरची रात्र त्याने वडगाव येथे काढून दुसऱ्या दिवशी तो सिंहगडावर आला. २६ ऑक्टोबरच्या रात्री पेशवा काही घोडेस्वारांसह महाडला गेला. तेथे त्याला त्याचे काही सैनिक येऊन मिळाले. त्या सैनिकांच्या संरक्षणाखाली दुसरा बाजीराव भूमिगत झाला व गुप्तपणे पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील सुवर्णदुर्ग या किल्ल्याच्या आश्रयाला आला. तेथून त्याने मुंबई येथील ब्रिटिश गव्हर्नरशी संपर्क साधला व त्याच्याकडे आश्रय मिळावा अशी विनंती केली. डिसेंबर, इ.स. १८०२ च्या मध्यात होळकराची एक तुकडी सुवर्णदुर्गला पोहोचली पण त्यापूर्वीच दुसरा बाजीराव इंग्लिश जहाजातून १७ डिसेंबर, इ.स. १८०२ रोजी वसई येथे पोहोचला. तेथे कर्नल क्लोजने त्याचे स्वागत केले. तिथेच कर्नल क्लोजने कंपनीच्या वतीने पेशव्याशी वाटाघाटी केल्या आणि ३१ डिसेंबर, इ.स. १८०२ रोजी दुसऱ्या बाजीरावाने वसईच्या तहावर स्वाक्षरी केली.

तहातील अटीसंपादन

वसईचा तह हा एक संरक्षणात्मक करार होता. यात पेशवा आणि ईस्ट इंडिया कंपनी व त्यांच्या मित्राच्या प्रदेशाची परस्पर संरक्षणाची अट होती. हैदराबादचा निजाम, अयोध्येचा नवाब आणि म्हैसूरच्या राजाशी वेलस्लीने जे तैनाती फौजेचे तह केले होते त्या तहातील जवळजवळ सर्व अटी या तहात होत्या.

  • या तहाद्वारे पेशव्याने सहा बटालियनची (६००० लढवय्ये) फौज स्विकारली. यात कायमस्वरूपी देशी पायदळाचा समावेश होता आणि त्याला युरोपियन तोफखान्याची व इतर शस्त्रास्त्रांची जोड होती. हे सारे सैन्य पेशव्याच्या मुलुखात कायमस्वरूपी राहणार होते.
  • या फौजेच्या खर्चासाठी वार्षिक सव्वीस लाख रुपये उत्पन्नाचे जिल्हे कंपनीला तोडून देण्यात आले होते.
  • या तहाद्वारे पेशव्याने त्याचे सुरतवरील सर्व अधिकार सोडून दिले.
  • कंपनी व बडोद्याचे गायकवाड यांच्यात जे करारमदार झाले त्यांना पेशव्याने मान्यता दिली.
  • पेशव्याचे गायकवाड व निजामाशी जे वाद होते ते सर्व मध्यस्थीसाठी कंपनीकडे सोपविले.
  • इतर सत्तांशी भविष्यात ब्रिटिशांच्या पूर्वपरवानगीशिवाय युद्ध किंवा तह न करण्याचे पेशव्याने मान्य केले.

परिणामसंपादन

दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटिशांशी केलेला वसईचा तह शिंदे, भोसले या मराठा सरदारांना मान्य नव्हता. या तहाच्या वेळी पुण्यावर यशवंतराव होळकराचा ताबा होता. त्याच्यामुळेच बाजीरावाने ब्रिटिशांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला होता. बाजीरावाने तह केल्याचे कळाल्यावर होळकराने ब्रिटिशांविरूद्ध शस्त्र धारण करण्याचा निर्णय घेतला. पण होळकराच्या या निर्णयाला इतर मराठा सरदारांनी प्रतिसाद दिला नाही. यशवंतराव होळकरापाशी ब्रिटिशांशी एकहाती लढण्याचे सामर्थ्य नव्हते त्यामुळे तो पुण्यातून निघून गेला व दुसऱ्या बाजीरावाचा पुण्यातील पेशवेपदाचा मार्ग मोकळा झाला. दुसरे इंग्रज-मराठा युद्ध हेही या तहाच्या परिणामामुळेच झाले होते.

दुसऱ्या बाजीरावाची पेशवेपदी पुनर्स्थापनासंपादन

वसईच्या तहाची अंमलबजावणी करण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाची पुणे येथे पुनर्स्थापना करणे ब्रिटिशांना गरजेचे होते. वेलस्ली हा २० एप्रिल, इ.स. १८०३ यादिवशी पुण्यात आला व त्याने कर्नल बॅरी क्लोज याला संदेश पाठवून दुसऱ्या बाजीरावाला पुण्याला घेऊन येण्यास सांगितले. दुसऱ्या बाजीरावाला कडक सुरक्षेत पुण्याला आणण्यात आले व १३ मे, इ.स. १८०३ रोजी त्याची रीतसर पेशवेपदी पुनर्स्थापना करण्यात आली.

हे सुद्धा पहासंपादन

संदर्भ आणि नोंदीसंपादन

बाह्यदुवेसंपादन

🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन