डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल

डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल (इंग्लिश: Deoxyribo nucleic acid, डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक अ‍ॅसिड) हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदूमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्लेइक[मराठी शब्द सुचवा] आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लाच्या म्हणजेच डीएनए मध्ये जीवित प्राण्याबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचनेमध्ये मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व महत्त्वाचे घटक असतात. हे घटक गुणसूत्रे ठरवतात. गुणसूत्रतंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्तीच्या मातापित्यांची ओळख निश्चित करता येते. न्यायसहायक शास्त्रात (फोरेन्सिक) याचा उपयोग होतो.प्रत्येक व्यक्क्तीच्या सेल न्युक्लिअस मध्ये डी एन ए असते.. सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रिच माईस्चर याने एका वापरलेल्या सर्जिकल बॅंडेजमधील पू व रक्त यामधून एक सूक्ष्म पदार्थ वेगळा केला. सेलच्या (पेशीच्या) न्युक्लिअसमध्ये त्याचे अस्तित्व असल्याने त्याला 'न्युक्लेईन' असे नाव दिले गेले. हेच न्यूक्लेइन पुढे डीएनए म्हणून ओळखले जाऊ लागले.

डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाची रचना दाखवणारे चित्र

डीएनए मध्ये कोडिंग आणि नॉनकोडिंग असे क्रम असतात. नॉन कोडिंग डीएनए बेसेसचा क्रम प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. व्यक्तीचे वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तीची ओळख नॉन कोडिंग बेसेसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डीएनए ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये डीएनए ठसे एकसारखेच असतात.

डीएनए टेस्ट करताना व्यक्तीच्या रक्त, केस, वीर्य, इत्यादी नमुन्यातून डीएनए वेगळी केले जातात. त्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनच्या सहाय्याने घेतलेल्या डीएनए नमुन्यातील मात्रा वाढवण्यात येते. व त्याचे तुकडे केले जातात. या प्रक्रियेला फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात. नंतर इलेक्ट्रोफोरेसीनने हे तुकडे वेगळे करून त्यांचे सदर्न ब्लॉटिंग पद्धतीने नायलॉन मेंब्रेनवर स्थलांतरण करण्यात येते. त्या ठशांमध्ये स्पष्टपणा यावा यासाठी रेडिओअ‍ॅक्टिव्ह रसायनाने लेबलिंग करण्यात येते. मेंब्रेनवर एक्स रे फिल्म ठेवण्यात येते. आणि मग रेडिओ अ‍ॅक्टिव्ह किरणांनी ती डेव्हलप केली जाते. मग हे ठसे पट्ट्याच्या रूपात दिसू लागतात. अशा प्रकारे डीएनए ठसे मिळवले जातात.आणि मग ते ठसे इतर ठशांबरोबर जुळतात की नाही ते पाहिले जाते व निष्कर्ष काढले जातात.

एखाद्या व्यक्तीची डीएनए चाचणी करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे मात्र अत्यावश्यक आहे. भारतात हैदराबाद, बंगलोर इत्यादी ठिकाणी अत्याधुनिक डीएनए चाचणी केंद्रे आहेत.

सर्वसामान्यपणे शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असली तरी इतरही ठिकाणी ती चाचणी उपयुक्त ठरते.उदाहरणार्थ --
१) अनुवंशिक रोग, विकार, विकृती यांची माहिती नवजात बालकाच्या जन्माआधी डीएनए चाचणीने मिळावता येते. व त्यावर वेळीच योग्य उपचार करता येतात.
२) डीएनए चाचणीचा वापर करून बी-बियाणे, तसेच विक्रीसाठी ठेवले मांस, मशरूमसारखे पदार्थ यांचा दर्जा तपासता येतो.
३) डीएनए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तीचे, प्राण्याचे वा वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते.
४) डीएनए चाचणीमुळे व्यक्तीचे मातृत्त्व vaa पितृत्त्व सिद्ध करता येते.

डीएनए चाचणीसंपादन

मुख्य लेख: डीएनए चाचणी
🔥 Top keywords: तुकाराम बीजसंत तुकारामक्लिओपात्राशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावामुखपृष्ठविशेष:शोधाक्रिकेटविनायक दामोदर सावरकरशिव जयंतीदिशागणपती स्तोत्रेप्रकाश आंबेडकरसंभाजी भोसलेनवग्रह स्तोत्रकबड्डीभारताचे संविधानमहाराष्ट्रनवरी मिळे हिटलरलाजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्ञानेश्वरखो-खोमहात्मा फुलेहोळीमहाराष्ट्र पोलीसमहात्मा गांधीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनाशिक लोकसभा मतदारसंघमराठी भाषारायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेनवनीत राणारोहित शर्माहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्राशाहू महाराजप्रदूषणविराट कोहलीजलप्रदूषणमहेंद्र सिंह धोनीसचिन तेंडुलकरलोकसभासावित्रीबाई फुलेमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणचाफावंचित बहुजन आघाडीआंतरजाल न्याहाळकजागतिक दिवससम्राट अशोक जयंतीमटकाग्रामपंचायतअरविंद केजरीवालदेहूनाटकपुन्हा कर्तव्य आहेगुढीपाडवाभारतभारताचा इतिहासस्वामी विवेकानंदविरामचिन्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखासदारसुप्रिया सुळेशेतकरीआंबेडकर जयंतीसूत्रसंचालनगौतम बुद्धऋतुराज गायकवाडसम्राट अशोकगजानन महाराजपुणे लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमराठी व्याकरणसमर्थ रामदास स्वामीफुटबॉलभारतातील मूलभूत हक्कए.पी.जे. अब्दुल कलामलोकमान्य टिळकबाराखडीनामदेववि.वा. शिरवाडकरक्रिकेटचा इतिहासअहिल्याबाई होळकरएकनाथवर्ग:मराठी अभिनेतेसुभाषचंद्र बोससमासहॉकीभारतीय निवडणूक आयोगगालफुगीस्वामी समर्थशिवनेरीसंगणक विज्ञानमहाराष्ट्र शासन